PCMC भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकारी तेजस्विनी कदम यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर अनुप मोरे यांच्यावर गुन्हा दाखल…

(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) अनुप मोरे आणि तेजस्विनी कदम यांच्यात अनेक वर्षांपासून मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे जाहीर आहे. मात्र, अचानक असे काय झाले की, दोघांमधील वाद इतका टोकाला गेला यावरून विविध चर्चा सुरू आहे. आपण घटनास्थळी नव्हतो, बदनामी करण्याच्या हेतुने आपल्यावर खोटे आरोप केले जात असल्याचे मोरे यांनी म्हटले असून आरोप खोटे असल्याचे म्हटले. दोघांनाही पक्षातील वरिष्ठांशी बोलून आपली बाजू माध्यमासमोर मांडू असे म्हटल्याची माहिती मिळतीय. तेजस्विनी कदम काही वर्षांपासून राजकारणात आणि भाजपात सक्रिय आहेत. अनुप मोरे भाजपाचे कट्टर कार्यकर्त्ये असून त्यांच्या आई पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेविका आहेत.तेजस्विनी कदम यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले की, एका मित्राच्या बंगल्यावर गेले असता बंगल्याबाहेर जमलेल्या अनुप मोरे यांच्या समर्थकांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केली. फक्त हेच नाही तर मला पोलिसांसमोरही मारहाण करण्यात आली. तेजस्विनी कदम यांनी दिलेल्या तक्रारीनंतर अनुप मोरे यांच्या समर्थकांवर गुन्हे दाखल करण्यात आली. मात्र, अनुप मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.पिंपरी चिंचवड भाजप युवा मोर्चाच्या महिला पदाधिकारी तेजस्विनी कदम आणि भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्यातील वाद टोकाला पोहोचलाय. एकेकाळी दोघे एकमेकांचे चांगले मित्र होते. हेच नाही तर तेजस्विनी कदम यांना राजकारणात भक्कम पाठिंबा देताना अनुप मोरे दिसत. अचानक यांच्या मैत्रीमध्ये इतके मोठे वादळ आले की, प्रकरण थेट पोलिस ठाण्यापर्यंत जाऊन पोहोचले आहे. तेजस्विनी कदम यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर अनुप मोरे यांच्यावर अखेर अनेक घडामोडींनंतर गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाने विविध चर्चांना उधाण आले असून तेजस्विनी कदम यांनी गंभीर आरोप केली आहेत. आपल्या विरोधात सर्व गोष्टी अनुप मोरे हाच करत असून गुन्हात त्याचे नाव का नाही? आणि त्याच्यावर गुन्हा दाखल का नाही? असा प्रश्न तेजस्विनी कदम यांनी उपस्थित करत पोलिसांना जाब विचारला. त्यावेळी अनुप मोरे यांचे नाव घ्यायचे राहिल्याचे सांगत दुसऱ्या दिवशी अखेर अनुप मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तेजस्विनी कदम यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर अनुप मोरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
