HSRP नंबर प्लेट लावण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत प्लेट बसवण्याची मुदत..

HRC no

पुणे :  (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) HSRP प्लेट्स मिळवण्यासाठी, वाहनधारकांनी अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. यामध्ये वाहनाचे RC (नोंदणी प्रमाणपत्र) क्रमांक, जवळचे फिटमेंट सेंटर निवडणे, आवश्यक शुल्क भरणे आणि अपॉइंटमेंट बुक करणे यांसारख्या गोष्टी कराव्या लागतात. ठरलेल्या तारखेला नेमून दिलेल्या केंद्रावर जाऊन प्लेट्स बसवून घेणे बंधनकारक आहे.

काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने एचएसआरपी नंबर प्लेट सगळ्या वाहनांसाठी सक्तीचे केले आणि वाहन चालकांमध्ये एकच गोंधळ उडाला. जो तो एचएसआरपी (HSRP) नंबर प्लेट लावण्यासाठी धावपळ करत होता. हीच धावपळ कमी व्हावी म्हणून राज्य सरकाने एकदा नाही दोनदा नाही तर ५ वेळा मुदतवाढ दिली. मात्र अजूनही कित्येक लोकांनी त्यांच्या वाहनांसाठी एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घेतलेली नाही. राज्य सरकारकडून ३० नोव्हेंबरपर्यंत वाहनधारकांना एचएसआरपी (HSRP) नंबरप्लेट बसविण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे.महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात तर अजूनही ७ लाखांपेक्षा अधिक वाहने एचएसआरपी नंबर प्लेटशिवायच धावत असल्याचे समोर आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील ९ लाख २६ हजार ८३१ वाहनांपैकी ७ लाख २६ हजार ९१८ वाहने एचएसआरपी शिवाय धावत आहेत. सोलापूरच नाही तर राज्यातील अनेक जिल्ह्यात हीच परिस्थिती आहे.

महाराष्ट्रात आता सर्व प्रकारच्या गाड्यांसाठी एचएसआरपी (High Security Registration Plate) असणं बंधनकारक केलं आहे. मग ती गाडी टुव्हिलर असोत, फोर व्हिलर किंवा थ्री व्हिलर. हे केवळ एक पर्याय नाही, तर सरकारने केलेला कायदेशीर नियम आहे. जर तुमच्याकडे ही प्लेट नसेल, तर आरटीओ किंवा ट्रॅफिक पोलीस तुमच्यावर कारवाई करू शकतात.

पोलीस रस्त्यावर थांबवून वाहनांची तपासणी करतात. जर HSRP नसेल, तर थेट दंड आकारला जातो. काही वेळा वाहन जप्त होण्याची शक्यताही असते. एकूण पाचवेळच्या मुदतीनंतर सध्या ३० नोव्हेंबरपर्यंत प्लेट बसवण्याची मुदत आहे. तरीही अजून अनेक वाहने एचएसआरपी नंबरप्लेटविना फिरत आहेत. मुदतीनंतर त्या वाहनास मोटार वाहन कायद्यातील कलम १७७ नुसार पहिल्यांदा १००० रुपये दंड होणार आहे. त्यानंतर आणि पुन्हा ही चूक झाल्यास दंड वाढू शकतो. काही स्रोतांनुसार, हा दंड ₹१,००० ते ₹१०,००० पर्यंत असू शकतो.

भारतात केंद्र सरकारने एप्रिल २०१९ पासून सर्व नव्या वाहनांसाठी HSRP बंधनकारक केली आहे. परंतु जुन्या वाहनधारकांनाही ही प्लेट लावणं अनिवार्य करण्यात आलं आहे. विशेषतः दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान यासारख्या अनेक राज्यांत तीव्र मोहीम राबवून दंड आकारला जातो. HSRP ही नंबर प्लेट अॅल्युमिनियमची बनवलेली असते, ज्यामध्ये हॉट स्टॅम्प्ड क्रोम कोड, प्रेशर रिव्हेट्स आणि एक युनिक नंबर असतो. ही नंबर प्लेट गाडीच्या मालकाच्या नोंदणीशी लिंक असते, त्यामुळे गाडी चोरीला गेली, बनावट नंबर प्लेट वापर किंवा गैरवापर टाळता येतो.

वाहनधारकांनी परिवहन विभागाच्या http://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन एचएसआरपी पाटीसाठी वेळ घेणे आवश्यक आहे. ही वेळ ३० नोव्हेंबर २०२५ पूर्वी घेतल्यास संबंधित वाहनावर कोणतीही कारवाई होणार नाही. यानंतर देखील एचएसआरपी पाटी बसवलेली नसलेली वाहने वायुवेग पथकांच्या तपासणीदरम्यान आढळल्यास संबंधित वाहनचालकांवर नियमांनुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.

Latest News