राष्ट्रवादीवर संकटावर संकट

मुंबई: नवाब मलिक यांची कन्या निलोफर यांचे समीर खान हे पती आहेत. ड्रग्जप्रकरणातील संशयित करण सजनानी यांच्यासोबत समीर खान यांचा गुगल पे द्वारे 20 हजार रुपयांचा व्यवहार झाला होता. सजनानी याने ड्रग्ज पुरवल्यामुळे समीर यांनी त्यांना 20 हजार रुपये गुगल पेने पाठवल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एनसीबीने समीर यांना बोलावल्याचं सांगितलं जातं. एनसीबीच्या पथकानं मागील आठवड्यात खार परिसरातून ब्रिटिश नागरिक करण संजनानी व राहिल फर्निचरवाला यांना अटक केली होती. त्यांच्याकडून २०० किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं. समीर खान यांचा संजनानी व फर्निचरवाला यांच्याशी नेमका काय संबंध आहे? संजानी व समीर यांच्यात २० हजार रुपयांची देवाणघेवाण का झाली होती?, याची माहिती एनसीबीकडून घेतली जाणार आहे. दरम्यान, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यामुळं गदारोळ उठला असतानाच मलिक यांच्या जावयाला समन्स

Latest News