पिंपरी – महापालिके च्या स्मार्टसिटी योजनेतील कामांची चौकशी करा :सुलभा उभाळे

पिंपरी – स्मार्ट सिटी निविदेच्या अंदाजपत्रकात बायलान कंपनीच्या वॉटर मीटर खरेदीचा दर पाच वर्षाच्या देखभाल-दुरूस्तीसह 10 कोटी रूपये आहे. मात्र, करारनाम्यात हा दर 81 कोटी दाखविला आहे. सर्व्हररूमसाठी लागणारे दोन फायरवॉल (हार्डवेअर) जे एकाच कंपनी व मॉडेलचे असताना स्मार्ट सिटी योजनेतील विविध कामांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना नेत्या सुलभा उबाळे यांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली
सुलभा उबाळे यांनी मुंबईत एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.युवासेनेचे अजिंक्य उबाळे त्यांच्या समवेत उपस्थित होते. उबाळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्मार्ट सिटी निविदेच्या अंदाजपत्रकात बायलान कंपनीच्या वॉटर मीटर खरेदीचा दर पाच वर्षाच्या देखभाल-दुरूस्तीसह 10 कोटी रूपये आहे. मात्र, करारनाम्यात हा दर 81 कोटी दाखविला आहे. सर्व्हररूमसाठी लागणारे दोन फायरवॉल (हार्डवेअर) जे एकाच कंपनी व मॉडेलचे असताना त्यांचे एकाचे दर 66 लाख 42 हजार तर, दुसऱ्याचे दर 6 कोटी 6 लाख दाखविले आहेत. महिंद्रा कंपनीचे दोन जनरेटर प्रत्येकी 2 कोटी 57 लाख याप्रमाणे घेतले आहेत.