आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनाच माहित नाही की त्यांना काय हवं आहे….हेमा मालिनी


नवी दिल्ली | अहवाल सादर करण्यासाठी एक समितीही स्थापन केली आहे. मात्र या समितीला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप खासदार हेमा मालिनी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनाच माहित नाही की त्यांना काय हवं आहे. नव्या कृषी कायद्यांबाबत समस्या काय आहेत हे देखील त्यांना माहित नाही यावरून शेतकरी कोणाच्यातरी सांगण्यावरून आंदोलनासाठी बसले हे स्पष्ट होत असल्याचं हेमा मालिनी यांनी म्हटलं आहे.दरम्यान, शेतकरी आणि सरकार यांच्यामध्ये अनेक बैठका पार पडल्या आहेत. मात्र एकाही बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही….