भाजप चे सोलापूर उपमहापौर पदावरुन आणि पक्षातून हकालपट्टी…..

सोलापूर :  राजेश काळे यांच्यावर महापालिका उपायुक्त धनराज पांडे यांना र्वाच्य भाषेत शिवीगाळ करून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना देण्यात आला होता. भाजपच्या गोटातून त्यांची उपमहापौर पदावरुन आणि पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी होती. त्यामुळे अखेर भाजपच्या कार्यकारिणीने हा निर्णय घेतला उपमहापौर राजेश काळे यांनी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे, विभागीय अधिकारी निलकंठ मठपती यांना शिवीगाळ केली. तसंच उपायुक्त पांडे यांच्याकडे खंडणी मागितल्याचा काळे यांच्यावर आरोप आहे. बेकायदेशीर कामासाठी राजेश काळे अनेक दिवसांपासून पालिका अधिकाऱ्यांवर दबाव आणत होते. त्यातूनच त्यांनी खंडणीची मागणी केली, असा आरोप महापालिका उपायुक्त पांडे यांनी केलाय. काळे यांच्याविरोधात सोलापूरच्या बझार पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत नियमबाह्य कामे आणि कर्मचाऱ्यावर दबाव आणून कामे करून घेणे खपवून घेणार नसल्याचा इशारा पालिका आयुक्तांनी दिला.दुसरीकडे भाजपातील काही लोकांनीच माझ्याविरूद्ध षडयंत्र रचल्याचा राजेश काळे यांनी आरोप केला आहे. मी अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली आहे मात्र खंडणी मागितले नसल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच पोलिस चौकशीला सामोरे जाण्याची तयारी…