राजकीय दबावाला बळी न पडता पोलिसांनी चौकशी करावी- चित्रा वाघ


मुंबई | राजकीय दबावाला बळी न पडता पोलिसांनी चौकशी करावी, असं आवाहन चित्रा वाघ यांनी केलं आहे. त्या मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होत्या. मुलीनं केलेल्या आरोपांमध्ये जर काही तथ्य असेल आणि धनंजय मुंडे दोषी आढळले तर नियमाप्रमाणं त्यांना शिक्षा व्हावी, असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका तरुणीने बलात्काराचे आरोप केले आहेत. या प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.पोलीस आणि सरकारची महिलांबद्दलची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत राज्यातील महिला आणि लेकीबाळी सुरक्षित राहणार नाहीत, असं भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्यात.