फुटिरतावादी राजकारणाविरोधातील, काँग्रेस,डाव्यांना ममता बॅनर्जीचं निमंत्रण…

कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना साथ द्यावी, असे आवाहन तृणमूल काँग्रेसने केले आहे. येथे एप्रिल-मे महिन्यात 294 विधानसभा जागांसाठी निवडणुका होणार आहेत. तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा खासदार सौगत रॉय यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला, ते म्हणाले, ”जर डावे आणि काँग्रेस खरोखरच भाजपविरोधात आहेत, तर त्यांनी भाजपच्या सांप्रदायिक तथा फुटिरतावादी राजकारणाविरोधातील लढाईत ममता बॅनर्जी यांना साथ द्यायला हवी.” एवढेच नाही, तर तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी याच भाजपविरोधात धर्मनिरपेक्ष राजकारणाच्या खरा चेहरा आहेत, असेही रॉय म्हणाले.  काँग्रेस आणि डाव्या विचारांच्या पक्षांनी भाजपच्या सांप्रदायिक तसेच फुटिरतावादी राजकारणाविरोधात यावेळी रॉय यांनी दावा केला, की केंद्रात भाजपच्या नेतृत्वातील सरकारने सुरू केलेली एकही योजना यशस्वी झाली नाही.