अप्पर इंदीरानगर भागात 2 पिस्टल सह एकाला,गुन्हे शाखेच्या युनिट 1 कडून अटक

पुणे प्रतिनिधी परिवर्तनाचा सामना ऑन लाईन : अप्पर इंदीरानगर भागात २ पिस्टल व २ जिंवत काडतुसे जवळ बाळगणाऱ्या गुन्हेगार तरुणास गुन्हेशाखेच्या युनिट १, कडून

अटक करण्यात आली

गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार युनिट-१ च्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग व गुन्हेगार चेकिंग करीत असताना पोलीस अंमलदार अमोल पवार यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, अप्पर इंदीरानगर भागात एक इसम पिस्टल घेवुन संशयरित्या फिरत आहे

वरिष्ठच्या आदेशाने परवानगीने युनिट-१, गुन्हे शाखा, पुणे शहर पथकाकडील स्टाफसह बातमीप्रमाणे दोन पंचासह अप्पर इंदीरानगर पीएमपीएल आवार येथे पीएमसी प्रभाग क्रमांक ३८ ची चैत्रबन आरोग्य कोटीसमोर जावुन छापा घातला

असता सदर इसम मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव रमेश नरसिंग राठोड वय ३० वर्षे रा. चिकन मार्केटजवळ, गणेश मित्र मंडळ बाजुला, मंजाळकर चौक वडारवाडी पुणे असे असल्याचे सांगीतले. त्याची स्टाफचे मदतीने पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचे जवळ असलेला पिशवीमध्ये २ गावठी बनावटीचे पिस्टल मॅगझीनसह, २ जिंवत काडतुसे असा कि.रु. १,२२,०००/- चा माल मिळुन आला

असुन ते पंचा समक्ष जप्त करुन त्याचेविरुध्द बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर १४/२०२१ आर्म अॅक्ट क ३(२५) व महा.पो.अधि. क ३७(१) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर आरोपी याने सदरचे पिस्टल जवळ बाळगण्याचा मुख्य उद्देश काय आहे या बाबत अधिक तपास करता त्याने सांगितले.

सदरचे दोन्ही पिस्टल रोहित ऊर्फ गोपाळ गवळी रा. दांडेकर पुल दत्तवाडी पुणे याने ठेवण्यासाठी दिले होते त्यानुसार त्याचा शोध घेत आहोत. त्याबाबतचा पुढील तपास बिबवेवाडी पोलीस स्टेशन हे करीत आहे. सदरची कामगिरी गुन्हे शाखा पुणे शहर चे अपर पोलीस आयुक्त, मा.श्री. अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे. श्री बच्चनसिंग, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-१ श्री सुरेंद्र देशमुख यांचे मार्गदशनाखाली युनिट-१ गुन्हे शाखा, पुणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुनिल ताकवले, पोलीस उप-निरीक्षक संजय गायकवाड, पोलीस अंमलदार अमोल पवार, अजय थोरात, आय्याज दड्डीकर, योगेश जगताप, महेश बामगुडे, तुषार माळवदकर, सतीश भालेकर यांनी केली आहे.