सर्वोच्च न्यायालयानं लक्ष्मण रेषा ओलांडली – जेष्ठ घटनातज्ञ उल्हास बापट

नवी दिल्ली: एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. सीएए, लव्ह जिहाद, देशद्रोह यांसारखे कायद्याचे विषय न्यायालयापुढं आहेत. मात्र तात्काळ कृषी कायद्यांना स्थगिती दिली गेली. अचानक एवढी तत्परता न्यायालयात आली कोठून, असा सवालही बापट यांनी केला.दरम्यान, केंद्र सरकारच्या नविन कृषी कायद्यांच्याविरोधात शेतकरी गेल्या दिड महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. तरीदेखील सरकार यावर कोणताच तोडगा काढत नाहीय कृषी कायद्यांना स्थगिती देऊन सर्वोच्च न्यायालयानं लक्ष्मण रेषा ओलांडली असल्याचं, बापट यांनी म्हटलं आहे.

Latest News