मुंडेंचा राजीनामा घेणार नाही….


मुंबई – विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागितला जात आहे. तर महाविकास आघाडीकडून मुंडेंच्या बाजूने सावध भूमिका घेत त्यांना अभय दिले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीनंतर मुंडेंचा राजीनामा घेणार नाही, अशी रोखठोक भूमिका पवार यांनी मांडली. धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार करणाऱ्या रेणू शर्मा यांच्यावर भाजप नेते कृष्णा हेगडे, मनसे नेते मनीष धुरी यांनी गंभीर आरोप केले. या आरोपांनंतर या प्रकरणाला वेगळे वळण लागले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिग्गज नेत्यांची आज बैठक पार पडली. या बैठकीनंतर शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांसमोर भूमिका मांडली. शरद पवार म्हणाले, धनंजय मुंडे यांच्या राजीनामाचा विचार करण्याची गरज आहे की नाही यात मतभिन्नता असू शकते. आरोप करणाऱ्याबाबत एकापेक्षा एक अधिक गोष्टी पुढे आल्यानंतर त्यातील सत्यता समोर आली पाहिजे. नाहीतर कुणावरही आरोप करायचे आणि सत्तेपासून दूर व्हा, अशी प्रथा पडू शकते. त्यामुळे त्याची सत्यता पुढे यावी. मग आम्ही निर्णय घेऊ. त्यामुळे सध्या आम्ही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार नाही. सत्य समोर आल्यावर निर्णय घेऊ, अशी भूमिका त्यांनी मांडली. तसेच आरोप करणाऱ्या व्यक्तीविषयी इतर काही गोष्टी पुढे आल्या आहेत. आता हे प्रकरण पोलिसांत गेले आहे. त्यामुळे संपूर्ण पोलीस चौकशीनंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं पक्षाच्या बैठकीत ठरले आहे. तसेच एसपी दर्जाच्या महिला अधिकाऱ्याने या प्रकरणाचा चौकशी करावी. तसेच या संपूर्ण प्रकरणाची सत्यता जाणून घेतली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीदेखील धनंजय मुंडे यांची पाठराखण केली. ‘ज्या महिलने धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत. त्या महिलेवर इतर दोन नेत्यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केलेले आहेत. त्यावरुन या महिलेला ब्लॅकमेलिंग करण्याची सवय असल्याचे प्रतिबिंबित होत आहे. भाजपच्या एका माजी आमदाराने त्याविषयी स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे महिलेने केलेल्या आरोपांची चौकशी व्हायला हवी