2022 महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात

nete-1
  • पुणे (प्रतिनिधी:) परिवर्तनाचा सामना:
  • आगामी निवडणुकीत कदाचित एक सदस्य किंवा द्विसदस्य वॉर्ड रचना होणार असल्याने इच्छुकांनी आता आपल्या संभाव्य परिसराला टार्गेट करत नागरिकांशी संपर्क वाढविण्यास सुरवात केली आहे. आपल्या भागातील नागरिकांचा समावेश असलेले व्हॉट्‌सऍप ग्रुप तयार केले असून, त्याद्वारे करीत असलेल्या छोट्या-मोठ्या उपक्रमांची माहिती देण्यात येत आहे. महापालिका निवडणुकांसाठी एक वर्ष उरल्याने शहरातील सर्वच पक्षाचे कार्यकर्ते, इच्छुक व सामाजिक कार्यकर्त्यांनी विशेषतः तरुणांनी दिनदर्शिका, शुभेच्छा कार्ड, संक्रांतीचे वाण घराघरांत पोचवत आहेत. तसेच  तिळगूळ वाटपाच्या निमित्ताने नागरिकांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देत आपले लॉन्चिंग सुरू केले आहे
  • . आगामी महापालिकेच्या निवडणुका फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहेत. चार वर्षांपूर्वी म्हणजे जानेवारी 2017 मध्ये पहिल्या पंधरवड्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली होती. त्यामुळे घराघरांत प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्यास इच्छुक उमेदवारांनी सुरवात केली
  • आहे.
  • प्रत्यक्ष भेटीदरम्यान नागरिकांना मतदार नोंदणी केली आहे काय, गतवेळी कुठे मतदान केले, घरात किती मतदार आहेत, आदी बाबींची चौकशी करण्यात येत आहे. एकंदरीतच नव्या वर्षाच्या सुरवातीपासूनच महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाल्याचे दिसत आहे.
  • ‘वेट ऍण्ड वॉच’ असे असले तरी गेल्या निवडणुकीत अगदी थोड्या मताने पराभव झालेल्या इच्छुकांनी आणि माजी नगरसेवकांनी जोरदार कार्यक्रमाचे आयोजनास सुरवात केली आहे. तर आणखी काही जण आगामी काळात मैदानात उतरल्यानंतर येथे खरा रंग भरला जाणार आहे. त्या जोडीला विद्यमान नगरसेवकांची रणनीती महत्त्वाची ठरणार आहे. काही इच्छुकांनी परिसरातील युवक कार्यकर्त्यांना हाताशी धरून उपक्रमांद्वारे नियोजनाबाबत तेही अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे. दिनदर्शिका तयार करताना स्थानिक बाबींचा त्यात केलेला अंतर्भाव आणि आत्तापर्यंत केलेली ठळक कामे आणि त्याचा नागरिकांना झालेला फायदा दर्शविण्यात आला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर थेट संपर्कासाठी मर्यादा होत्या

Latest News