मी आजवर कुठलाही भ्रष्टाचार केला नाही- गणेश नाईक

ganesh-naik

नवी मुंबईः 2 5 वर्ष काहीही केले नाही जे केलं ते स्वार्थासाठी, असं विरोधक म्हणाले होते, त्यानंतर गणेश नाईकांनीही विरोधकांना चांगलंच शिंगावर घेतलंय.  मी कुणाला घाबरत नाही आणि कुणाचे नाव घेऊन टीका ही करत नाही. 25 वर्ष गणेश नाईकला लोकांनी मान्य केलेय. मी आजवर कुठलाही भ्रष्टाचार केला नाही.गणेश नाईकांनी खरपूस समाचार घेतलाय.

. मी भाजपमध्ये आहे आणि राहीन. मी भाजप सोडणार नाही. महापौर भाजपचाच बसेल, असा विश्वासही गणेश नाईक यांनी व्यक्त केलाय.  मी कुणाला घाबरत नाही आणि कुणाचे नाव घेऊन टीकासुद्धा करत नाही,” असं म्हणत भाजप नेते गणेश नाईक यांनी त्यांच्या राजकीय विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय. गणेश नाईक यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला होता

. तिथे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गणेश नाईकांवर टीकास्त्र सोडलं होतं, त्याचाच आता ज्यांना जी टीका करायची ती करू द्या. मी जनसेवेचा वसा कायम ठेवेन, असंही गणेश नाईक विरोधकांना उद्देशून म्हणालेत. आम्ही एक वर्षापूर्वीच नवी मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी केली होती. पण कोरोनामुळे ती वाया गेली. पण आता महाविकास आघाडी सक्षमपणे मैदानात उतरली आहे. महाविकास आघाडीचं जागा वाटप कसं होईल? बंडखोरी होईल, असं विरोधकांना वाटत आहे. पण तसं काही होणार नाही, असं विजय नाहटा यांनी सांगितलं

Latest News