निवडणुकीतील सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन-उपमुख्यमंत्री अजित पवार

ajit-dada-ncp-1

मुंबई ( प्रतिनिधी )

गावकारभाऱ्यांनो, आता मिळालेल्या संधीचे सोनं करा, जय-पराजय विसरून ग्रामविकासासाठी एकत्र या, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार, आपल्या संदेशात म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्था लोकशाहीचा पाया भक्कम करणारी आणि महात्मा गांधीजींचे ग्रामविकासाचे स्वप्न सत्यात आणणारी यंत्रणा आहे. या यंत्रणेतील ग्रामपंचायत हा महत्वाचा घटक आहे

. या ग्रामविकासाच्या प्रक्रियेत काम करण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे. गावाचा विकास करण्यासाठी लोकांनी तुमच्यावर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे तुमची जबाबदारी आता आणखी वाढली आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी दाखविलेल्या विकासाच्या मार्गावर आपल्या गावाला पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावं. जनतेचा विश्वास सार्थ ठरवत ग्रामविकासाचा आदर्श निर्माण करावा, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीतील सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले

असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तालुक्‍याचे लक्ष लागलेल्या महत्त्वाच्या ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला भाजपप्रणित पॅनलनी सुरुंग लावला. ओझर्डे येथे भाजपची सत्ता आली आहे, तर बावधनमध्ये भाजपप्रणित पॅनेलने सत्ताधारी राष्ट्रवादीला घाम फोडल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. राष्ट्रवादी नऊ तर भाजपचे आठ उमेदवार विजयी झाले आहेत. अन्य ग्रामपंचायतींमध्येही चुरस पाहायला मिळाली. येथील नवीन प्रशासकीय इमारतीत सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. 22 टेबलांवर प्रत्येकी सात फेऱ्या झाल्या. सुरुवातीला बावधनची मतमोजणी झाली.

सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये भाजपप्रणित पॅनलचे उमेदवार आघाडीवर होते. त्यामुळे उत्कंठा वाढत गेली. प्रत्येक वॉर्डमधून भाजपचे एक-दोन उमेदवार विजयी झाल्याचे समजताच मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. शेवटच्या फेरीपर्यंत निकालाचा अंदाज लागणे कठीण झाले होते. अखेर राष्ट्रवादीने नऊ जागा जिंकून सत्ता राखली आहे. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना आत्मपरीक्षण करायला लावणारा हा निकाल असून याचे दूरगामी परिणाम आगामी निवडणुकांमध्ये दिसणार आहेत.

Latest News