निडणुकीत महाविकास आघाडीने गैरप्रकार- चंद्रकांत पाटील

मुंबई | पदवीधर निडणुकीत महाविकास आघाडीने गैरप्रकार केले. या निवडणुकीतील गैरप्रकारांचा उलगडा करणारी मोठे हादरे देणारी पत्रकार परिषद मी येत्या दोन दिवसांत घेणार आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. काही ठिकाणी एकाच व्यक्तीची नावे मतदार यादीत अनेकदा आलेली होती. काही ठिकाणी कोऱ्या मतपत्रिका आल्या, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केलाय. “मी सध्या कार आणि सरकार दोन्ही चालवतोय. मध्ये खड्डे आणि अडचणी येत असतात, पण त्याचा माझ्यावर काही परिणाम होणार नाही”, असं विधान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. त्यास राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जशासतसं प्रत्युत्तर दिलं आहे. “उद्धव ठाकरे खूप चांगली कार चालवतात पण जेव्हा ते कार चालवत असतात तेव्हा त्यांच्यासाठी सर्व ट्राफिक थांबलेलं असतं”, असं फडणवीस म्हणाले. ते एबीपी माझा या वृत्तवाहिशी बोलत होते. राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकालावर बोलत असताना फडणवीस यांनी राज्यात भाजप एक नंबरचा पक्ष असल्याचा दावा केला. याच वेळी त्यांनी राज्याच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “उद्धव ठाकरे खूप चांगली कार चालवतात पण जेव्हा ते कार चालवत असतात तेव्हा त्यांच्यासाठी सर्व ट्राफिक थांबलेलं असतं. त्यामुळे ती कार व्यवस्थित चालते. असं सरकार चालवता येत नाही.ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच सर्वाच मोठा पक्ष ठरला असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत ग्रामपंचायत निवडणुकींच्या निकालावर भाजपची भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघांतील गैरप्रकारांबाबत मोठा दावा केलाय.

Latest News