.‘या’गावात जावयाने सासऱ्याचा,तर!सुनेने सासूचा पराभव केला


औरंगाबाद | धोंधलगाव ग्रामपंचायत निवडणुकीत शिवशाही पॅनलकडून सासू गोकर्णा आवारे आणि तर छत्रपती ग्रामविकास पॅनलकडून सून कल्याणी आवारे या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. शिवशाही पॅनलकडून जावई लक्ष्मण काळे हे तर त्यांचे सासरे रावसाहेब वैद्य हे छत्रपती ग्रामविकास पॅनलकडून एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात होते. आज लागलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालानुसार सून कल्याणी आवारे यांनी आपल्या सासू गोकर्णा आवारे यांचा पराभव केला आहे. तर दुसरीकडे जावई लक्ष्मण काळे यांनी त्यांचे सासरे रावसाहेब वैद्य यांचा पराभव केला आहे.
ग्रामपंचायतीत 40 वर्षांहून अधिक वेळ सफाई कर्मचारी म्हणून काम केले त्याच ग्रामपंचायतीत आता सदस्य म्हणून जाण्याचा मान द्रौपदी रामचंद्र सोनूले या 71 वर्षीय आजींना मिळाला आहे. त्यांची सेवेप्रती कटिबद्धता विचारात घेऊन ग्रामस्थांनी त्यांना निवडणुकीत उभे केले आणि आज त्यांच्यावर विजयाचा गुलाल उधळला. गडमुडशिंगी (ता.करवीर) येथील द्रौपदी रामचंद्र सोनूले या महिना 60 रूपये पगारापासून गेली 46 वर्षांहून अधिक काळ विनातक्रार गावात सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या सेवेचे फळ म्हणून गावकऱ्यांनीच मतांच्या रूपाने अशी परतफेड केली आहे.