मी सगळ्यांना पुरून उरलो

download

सोलापूर | सोलापूर जिल्ह्यात ऋतुराजनं 38 मतांनी विरोधी उमेदवारावर वियज मिळवला आहे. इतकंच नाही तर त्यानं निवडणुकीसाठी स्वत:चं पॅनेल उभं केलं आणि तेसुद्धा जिंकून आणलं.अगदी तालुक्यापर्यंत मला हरवण्यासाठी प्रयत्न झाले, पण मी सगळ्यांना पुरून उरलो, अशी प्रतिक्रिया ऋतुराजने बीबीसी मराठीशी बोलताना दिली आहे. आम्हा तरुणांना राजकारणापेक्षा गावच्या विकासात जास्त इंटरेस्ट आहे. जुन्या मंडळींना खुर्ची धरून ठेवण्यात रस जास्त आहे. आमचं तसं नाही, असं ऋतुराजने सांगितलं आहे. ग्रामीण भागात उच्चशिक्षणासाठी शहरात गेलेली मुलं फारशी गावाकडे फिरकत नाहीत. ऋतुराज याला अपवाद ठरले. त्यांनी BSc पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे आणि पुण्यात LLB साठी प्रवेश घेण्यास ते उत्सुक आहे.

 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आहे. पाटोद्यात आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या पॅनलाचा पराभव झाल्यानंतर भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणारे अण्णा हजारे यांच्या गावात म्हणजेच राळेगणसिद्धीमध्ये कोण जिंकणार याची सर्वांना उत्सुकता लागली होती. त्यानंतर अण्णांच्या विचारांच्या ग्रामविकास पॅनलने राळेगणसिद्धीमध्ये सर्वच्या सर्व 7 जागा जिंकल्याचे समोर आले आहे. राज्यात ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी होत असली तरी आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे पटोदा, पोपटराव पवारांचे हिवरेबाजार, आणि ज्येष्ठ जमाजसेवक अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी या तीन गावांच्या निवडणुकीची सर्वत्र चर्चा रंगली होती. कायम चर्चेत असणाऱ्या या गावांमध्ये कोणाची सत्ता येणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक होते.

Latest News