आम आदमी पक्षाने महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत निवडणुकीत उघडलं खातं

arvind-k

मुंबई । महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत निवडणुकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने आपले खाते उघडले आहे. लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील दापक्याळ ग्रामपंचायतीत ‘आप’चे ७ पैकी ५ उमेदवारांनी विजय मिळवला आहे. लातूर जिल्ह्याचे आपचे जिल्ह्याध्यक्ष प्रताप भोसले यांच्या नेतृत्वात ‘आप’ दापक्याळ ग्रामपंचायत निवडणुकीत ५ जागेबर विजय मिळवत ही ग्रामपंचायत खेचून आणली आहे महाराष्ट्र ग्रामपंचायतीतील या विजयानंतर अरविंद केजरीवाल यांनी मराठीत ट्विट करत विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. आपल्या ट्विटमध्ये अरविंद केजरीवाल म्हणतात की, ‘विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! जनतेने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला सार्थ करा, जनतेची सेवा करा. पुढील कार्यास शुभेच्छा.’ दरम्यान, आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार सर्वच राजकीय पक्ष सध्या या निवडणुकीत आपलीच सरशी होणार असल्याचा दावा करत आहेत. मात्र, खरं चित्र काहीच तासांत स्पष्ट होणार आहे. अंतिम निकाल काय लागतात ? हे पाहणे महत्त्वाचे आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत निवडणुकीत खातं उघडलं आहे. आम आदमी पक्षानं मराठवाड्यात व्हाया लातूर आपलं खातं उघडलं आहे. लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील दापक्याळ ग्रामपंचायतीत ‘आप’चे सात पैकी पाच उमेदवार निवडून आले आहेत. लातूर जिल्ह्याचे आपचे जिल्ह्याध्यक्ष प्रताप भोसले यांच्या नेतृत्वात ‘आप’ दापक्याळ ग्रामपंचायत निवडणुकीत पाच जागांवर ताबा मिळवत ही ग्रामपंचायत खेचून आणली आहे.

Latest News