शिवशाही व्यापारी संघ सल्लग्न शिवशाही कामगार आघाडी मावळ तालुक्यातील पदाधिकारी जाहीर:- कृष्णा दादा साबळे

मावळ:- प्रतिनिधी, (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) शिवशाही व्यापारी संघ सल्लग्न शिवशाही कामगार आघाडी या राज्यव्यापी संघटनेचे मावळ तालुक्यातील पदाधिकार्यांच्या नियुक्त्या लोणावळा येथील हॉटेल मुंबई मसाला या ठिकाणी बैठक घेऊन संस्थापक/ अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी नियुक्ती पत्रक देऊन जाहीर केल्या.
शिवशाही व्यापारी संघ प्रदेशाध्यक्ष कृष्णा दादा साबळे व शिवशाही कामगार आघाडी अध्यक्ष गणेश कलवले यांच्या नेतृत्वाखाली शिवशाही कामगार आघाडी मावळ तालुका १)अध्यक्षपदी दिलीप हरिभाऊ पवार, २)उपाध्यक्षपदी दयानंद मारूती कांबळे,३)संघटकपदी रवी पंढरीनाथ सरोदे, ४) लोणावळा शहर अध्यक्षपदी तुषार प्रकाश सावंत ५) लोणावळा शहर उपाध्यक्षपदी मारूती शंकर मंजुळे यांच्या नियुक्ती जाहीर करून त्यांना नियुक्ती पत्रक देण्यात आले.
सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी दाखले यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवशाही व्यापारी संघ मावळ तालुका अध्यक्ष जयेश देसाई, लोणावळा शहर कामगार नेते नामदेव खवळे, व्हायजंता कसबे, जेष्ठ नेते एकनाथ घोरपडे, भिसे, नाना रोकडे ,संदीप ओझरकार ,विनोद साबळे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
