शरद पवार यांची तब्येत अचानक खालावली असून त्यांना बारामतीहून पुण्यातील रुग्णालयात दाखल….

(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)- सध्या शरद पवार हे बारामतीत असून त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक (Ruby Hall Clinic) येथे नेण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. आज सकाळपासून त्यांना ताप, खोकला आणि कफचा त्रास जाणवत असल्याने डॉक्टरांची एक टीम त्यांच्या गोविंदबाग (Govindbaug) येथील निवासस्थानी दाखल झाली होती. त्या टीमने प्राथमिक तपासणी करून औषधोपचार सुचवले होते.आज बारामतीतील काठेवाडी (Kathewadi) येथे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या तेराव्याचा विधी पार पडत आहे. या कार्यक्रमाला शरद पवार तसेच कुटुंबीय उपस्थित राहणार होते, मात्र सकाळपासूनच त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना या कार्यक्रमाला जाणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांनी वैद्यकीय सल्ल्यानुसार विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे.शरद पवार यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
सध्या पुढील उपचारांसाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यांची तब्येत स्थिर ठेवण्यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जात आहे.शरद पवार यांची तब्येत अचानक खालावली असून त्यांना बारामतीहून पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती समोर येत होती, मात्र आज सकाळपासून त्रास वाढल्यामुळे डॉक्टरांनी अधिक तपासणीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्यांना तातडीने पुढील उपचारांसाठी पुण्यात हलवण्याची तयारी सुरू आहे.यानंतर दुपारच्या सुमारास पुन्हा एकदा डॉक्टरांची दुसरी टीम त्यांच्या प्रकृतीची पाहणी करण्यासाठी घरी पोहोचली. तपासणीनंतर पुढील उपचारांसाठी त्यांना पुण्यातील रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या तब्येतीबाबत फारशी माहिती दिली जात नव्हती, मात्र आज त्रास अधिक वाढल्याने वैद्यकीय पथक सतर्क झाले आहे.
