उच्चभ्रु सोसायटी मध्ये विनापरवाना चालु असलेल्या अवैद्द हुक्का पार्लरवर सहकारनगर पोलिसांची कारवाई,

21665

पुणे:(विनय लोंढे :ऑनलाईन न्यूज परिवर्तनाचा सामना)

राजमुद्रा हौसींग सोसायटीतील मेहेर लिव्हींग विल्डींग शेजारील श्री. गुरु नानक कृपा बिल्डींगमधील तिसरे मजल्याचे टेरेसवर धनकवडी पुणे येथे अवैध हुक्का पार्लर विनापरवाना चालु असल्याची बातमी मिळाल्याने सहकारनगर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे त्यामध्ये पार्लर च्या मालकसह पाच आरोपीना अटक केली आहे


सहकारनगर पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत गुलाबनगर चौकात आले असताना पोलीस हवालदार अमोल पवार यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, राजमुद्रा हौसींग सोसायटीतील मेहेर लिव्हींग विल्डींग शेजारील श्री. गुरु नानक कृपा बिल्डींगमधील तिसरे मजल्याचे टेरेसवर धनकवडी पुणे येथे अवैध हुक्का पार्लर विनापरवाना चालु आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाली होती त्यानुसार कारवाई केली आहे

काऊंटरवर हजर असलेल्या इसमाकडे सदरबाबत चौकशी करता तेथे हॉटेल मालक व वेटर हे मिळुन आले. त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता हॉटेल मालकाने त्याचे नाव १) राजसिंग भजनसिंग गोरोवाडा वय ३५ वर्षे धंदा व्यवसाय रा. गुरु नानक कृपा विल्डींग तिसरा मजला फ्लॅट नं. २ राजमुद्रा सोसायटी धनकवडी पुणे हुक्का ग्राहकांना ओढण्यासाठी तयार करून देणारा इसम नामे २) पारस परमानंद शर्मा वय २४ वर्षे धंदा वेटर रा. सदर मुळ रा. नेपाळगंज जि. बाके नेपाळ. वेटर नामे ३) सुभाष मानसिंग गिरी वय २० वर्षे धंदा वेटर रा.सदर मुळ रा. कंचनपुर जि.बिलोरी नेपाळ ४) तिलक भोला तिवारी वय ३५ वर्षे धंदा वेटर रा.सदर मुळ रा. टिकापुर जि. कैलानी नेपाळ ५) नारायण मेघे आचार्य वय ३४ वर्षे धंदा वेटर रा. सदर मुळ रा. रा. टिकापुर जि. कैलानी नेपाळ अशी असल्याची सांगितली

सदरची बातमी तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गणेश कर्चे यांना कळविली त्यांनी सदरची बातमी सहकारनगर पोलीस स्टेशन कडिल वरिष्ठ पालीस निरीक्षक श्री. विठ्ठल पवार यांना कळविली असता त्यांनी लागलीच तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांची टीम तयार करुन कारवाई केली

सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी राजमुद्रा हौसींग सोसायटीतील मेहेर लिव्हींग बिल्डींग शेजारील श्री. गुरु नानक कृपा बिल्डींगमधील तिसरे मजल्याचे टेरेसवर धनकवडी पुणे येथे प्रवेश करून जिन्याने टेरेसवर जावुन तेथील लाकडी दरवाजा तोडुन बातमीचे ठिकाणी जावुन छापा टाकला असता हॉलमध्ये एकुण ०६ टेबल मांडलेले दिसले. त्यामधील ०४ टेबलवर ०८ इसम हुक्का फ्लेवरचे सेवन करताना मिळुन आले.

. हॉटेलच्या किचनची पाहणी केली असता तेथे विविध फ्लेवरचे हुक्का भरलेले चिलीमसह टेबलवर मिळुन आलेले हुक्का पॉट व साहित्य तसेच किचनमधील विविध फ्लेवरचे हुक्का भरलेले चिलीम मिळुन आल्याने सदरचा १२,४९५/- रु किंमतीचा माल पंचा समक्ष जप्त करुन त्यांचेविरुध्द सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंवर ४३/२०२६, भारतीय न्यायसंहीता २०२३ चे कलम १२३, ३(५) तसेच सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम २०१८ चे कलम ४ अ, २१ अ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.


सदरची कामगीरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनोजकुमार लोंढे यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गणेश कर्चे, सद्दामहुसेन फकीर, सहा. पोउपनिरी बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, निलेश शिवतरे, किरण कांबळे, बजरंग पवार, सागर सुतकर, आशिष ढमाळ, निखील राजीवडे, अभिजीत वालगुडे, महेश भगत, आकाश किर्तीकर, खंडु शिंदे, अभिमान बागलाने, अमित पदमाळे, मारोती नलवाड, रफीक तडवी यांनी केली आहे.

Latest News