पिंपरी चिंचवड शहरातील SRA योजना बंद करा :युवक काँग्रेसचे नेते विशाल कसबेचे ठाकरे सरकारला साकडे

पिंपरी ( प्रतिनिधी ) पिंपरी चिंचवड शहरात सरासरी 70 ते 80 झोपडपट्ट्या आहेत यातील काही घोषीत तर काही अघोषित आहेत. या झोपडपट्ट्या नवनगर विकास प्राधिकरण, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, एम.आय.डी.सी.तसेच खाजगी जागेवर आहेत . सध्या पिंपरी चिंचवड शहरात SRA योजनेच्या नावाखाली विकासक ( बिल्डर) व झोपडपट्टीतील गुंड यांनी दहशत माजवली आहे. असल्याने शहर युवक काँग्रेस चे नेते विशाल कसबे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना निवेदन देऊन तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे झोपडपट्ट्यांचे J.N.N.U.R.M. योजने अंतर्गत कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात पुनर्वसन करण्यात आले आहे. त्या नंतर सत्ता बदल झाल्यानंतर उर्वरित काम थांबले यात फडणवीस सरकारच्या काळात कोणत्याही झोपडपट्टीचे पुनर्वसन झाले नाही. सध्या SRA च्या नियमानुसार कोणताही विकसक ( बिल्डर ) हा त्या झोपडपट्टी मधील नागरिकांच्या 70% सह्या या संमतीपत्रावर घेत आहे. या सह्या घेताना नागरिकांच्या स्वखुशीने घेणे अपेक्षित असताना हे नागरिकांना दमदाटी करणे व झोपडपट्टीतील सराईत गुन्हेगार यांना हाताशी धरून त्यांना आर्थिक रक्कम देऊन ते सह्या घेण्याचे काम करताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांची फसवंणूक चालू आहे परंतु प्रत्यक्षात SRA चा निकष असा सांगतो कि 1 जानेवारी 2000 पूर्वी चे वास्तव्याचे पुरावे दिल्यास त्यास या योजनेत मोफत घर ( निशुल्क ) दिले जाते .तसेच 1 जानेवारी 2000 नंतर 2018 पर्यंत पुरावे असतील तर त्यांना (सशुल्क ) पैसे घेऊन घरे देणार आहेत. मुळातच शहरातील 80% झोपडपट्ट्या मधील नागरिक हे 2000 पूर्वीच्या निकषात बसतच नाहीत आणि सर्वच झोपडपट्ट्यांचा सर्व्हे हा 2004 साली झालेला आहे. तर त्यांचे पुनर्वसन कसे करणार ? या विकसकांकडून नागरिकांची घोर फसवणूक होत आहे. त्यांची व्यवस्था कोठे करणार, त्यांना किती स्क्वेअर फूटांचे घर देणार व त्यांना किती दिवसांत ताबा मिळणार हे सर्व सांगण्यासाठी विकसक उडवा उडवींची उत्तरे देत आहेत. या आपले अनेक अधिकारी हे बिल्डरधार्जिणे धोरणांचे दिसत आहेत. असा आरोप पिंपरी चिंचवड युवक काँग्रेस चे शहर (सरचिटणीस) विशाल कसबे यांनी निवेदनावदारे केला आहे