मराठा आरक्षण: ५ फेब्रुवारीला न्यायालय निर्णय देणार

नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) यापूर्वी २५ जानेवारी ही तारीख निश्चित करण्यात आली होती. मराठा आरक्षणावरील सुनावणी पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे करण्यात येणार होती.’मुंबईत असलेल्या लोकांसोबत यासंदर्भात व्हर्च्युअल पद्धतीनं संवाद साधणं आम्हाला कठिण होत आहे. त्यामुळे यासदर्भातील सुनावणी ऑनलाईन पद्धतीनं न करता प्रत्यक्षरित्या घेतली जावी,’ अशी विनंती राज्य सरकारचे वकिल मुकुल रोहतगी यांनी न्यायालयाकडे केली. ‘२५ जानेवारीपासून या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता नाही ५ फेब्रुवारी रोजी न्यायालय आता यावर निर्णय देणार असल्याची माहिती समोर आली आहे.
. त्यामुळे ही सुनावणी प्रत्यक्षरित्या सुनावणी करता येईल का नाही किंवा कोणत्या तारखेपासून करता येईल याबद्दल दोन आठवड्यांनी निर्णय घेण्यात येईल,’ असं न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी यावेळी सांगितलं गेल्या महिन्यात झालेल्या सुनावणीदरम्यान मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला होता. त्यामुळे राज्य सरकारला मोठा धक्का बसला होता
. मराठा आरक्षणाची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी विविध उदाहरणे देऊन स्थगिती हटविण्याची विनंती केली होती. मात्र, त्याला न्यायालयानं स्पष्ट शब्दांत नकार दिला आणि पुढील सुनावणीसाठी २५ जानेवारी ही तारीख निश्चित केली होती. मराठा आरक्षणासंदर्भात आजपासून सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार होती. मात्र न्यायालयाने या सुनावणीला स्थगिती दिली आहे. आता या प्रकरणावर 5 फेब्रुवारीपासून सुनावणी होणार आहे
. पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडेल. यामध्ये न्यायमूर्ती रवींद्र भट, न्यायमूर्ती नागेश्वर राव, न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांचा समावेश आहे. राज्याच्या दृष्टीने मराठा आरक्षणाचा मुद्दा हा संवोदनशील असल्याने ही सुनावणी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. देशभरातील आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी व्हावी, या मागणीसाठी इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्र लिहण्याची शक्यता आहे
. मराठा आरक्षणाबाबत दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीदरम्यान कायदेतज्ज्ञांशी झालेल्या चर्चेतून ही सूचना पुढे आली होती. 25 जानेवारीपासून सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी सुरू होणार होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयात 5 दिवस आधीच म्हणजे आज मराठा आरक्षणावर सुनावणी होणार असल्याचं म्हटलं होतं. परंतु, न्यायालयाने या सुनावणीला आज स्थगिती दिली असून, आता या प्रकरणावर 5 फेब्रुवारीपासून सुनावणी होणार आहे.सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर आज सुनावणी पार पडणार होती. परंतु आता ती सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. राज्य सरकारच्या वकिलांनी न्यायालयासमोर ही सुनावणी ऑनलाईन पद्धतीनं न घेता प्रत्यक्षरित्या घेण्याची विनंती केली. दरम्यान, दोन आठवड्यांनी म्हणजेच ५ फेब्रुवारी रोजी न्यायालय आता यावर निर्णय देणार असल्याची माहिती समोर आली आहे.