पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक व स्वीकृत प्रभाग सदस्य यांचा राजीनामा घेऊन नवीन आरपीआय सदस्यांची निवड करावी:

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक व स्वीकृत प्रभाग सदस्य यांचा राजीनामा घेऊन नवीन सदस्यांची निवड करावी: आरपीआय ची मागणी
पिंपरी (प्रतिनिधी ) पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक व स्वीकृत प्रभाग सदस्य बदलण्याच्या हालचाली चालू आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत २४ स्वीकृत प्रभाग सदस्य व ३ भाजपचे स्वीकृत नगरसेवक आहेत.२०१७ च्या महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीस पिंपरी चिंचवड मधील नागरिकांनी एक हाती सत्ता दिली व त्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) चा शिंहाचा वाटा आहे. पिंपरी चिंचवड शहरातील रिपाई कार्यकर्त्यांनी भाजपा उमेदवारास भरभरून मते दिली.२०१७ पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी ने रिपाई पक्षास केवळ ३ जागा दिल्या होत्या. व सत्ता आल्यास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सतेत वाटा देऊ असे आश्वासन दिले होते. परंतु भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड ने ते आश्वासन पाळले नाही. केवळ एक स्वीकृत प्रभाग सदस्य पद देऊन मित्रपक्षाची बोळवन करण्यात आली. ते ही एक वर्षानंतर. आता स्वीकृत प्रभाग सदस्य व स्वीकृत नगरसेवक बदलाच्या हालचाली चालू आहेत असे आम्हास वर्तमान पत्रा द्वारे कळाले आहे. मागील चार वर्षा पासून भारतीय जनता पार्टी ने कधी ही मित्रपक्षांस विचारात घेतले नाही अथवा कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात बोलावले नाही तसेच शहराच्या अध्यक्ष व मुख्य कार्यकारणीला नेहमी सावत्रपनाची वागणूक दिली गेली. आगामी महानगरपालिका निवडणूक १ वर्षवर येऊन टेपली आहे तरी ही भारतीय जनता पार्टी मित्रपक्षांस विश्वासात घेत नाही असे आम्हास वारंवार वाटत आहे. तरी आपण स्वीकृत नगरसेवक व स्वीकृत प्रभाग सदस्य यांचा राजीनामा घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) पिंपरी चिंचवड शहराच्या कार्यकर्त्यास संधी द्यावी जेणेकरून पिंपरी चिंचवड शहरात एक चांगला सामाजिक संदेश जाईल. अथवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पिंपरी चिंचवड शहरात आपली वेगळी चूल २०२२ च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मांडेल.व स्वतंत्र पणे २०२२ पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुका लढवेल आणि यास पूर्णपणे भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर कारणीभूत असेलसुरेश शांताराम निकाळजेअध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर यांनी निवेदन दिले आहे