वंडरसॉफ्ट प्रोफेशनल तर्फे आयोजित ‘ग्लॅम महाराष्ट्र शो’चे आयोजन

वंडरसॉफ्ट प्रोफेशनल तर्फे आयोजित ‘ग्लॅम महाराष्ट्र शो’चे आयोजन
पुणे, प्रतिनिधी :
वंडरसॉफ्ट प्रोफेशनल तर्फे आयोजित ग्लॅम महाराष्ट्र शो’चे येत्या 26 फेब्रुवारी रोजी ग्लॅम ऑफ इव्हेंट कंपनी व नक्षत्र इव्हेंट यांच्या सहयोगाने आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पुण्यातील सातारा रस्त्यावरील अण्णाभाऊ साठे सभागृह येथे 26 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेत होणार आहे. यावेळी वंडरसॉफ्टचे व्हाईस प्रेसिडेंट नरेंद्र शर्मा उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती वंडरसॉफ्ट प्रोफेशनलचे झोनल मॅनेजर मोहन कुमार यांनी दिली. या शो’च्या माध्यमातून प्रामुख्याने महिलांना विशेषतः गृहिणींना व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. सहभागासाठी 8668321899 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.