शिवसेनेनं युती केली नसती तर भाजप ग्रामीण भागात पोहचलाच नसता …संजय राऊत

मुंबई | शिवसेना संस्थापक हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांंच्या 95 जंयतीनिमित्त शिवसेना आमदार संजय राऊतांसोबत पत्रकारांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.शिवसेनेनं युती केली नसती तर भाजप महाराष्ट्रात गावागावात पोहोचलं नसतं. भाजपला जे शिवसेनेवर जे आरोप करायचे आहेत ते करु द्या, असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे राम मंदिराची लढाई बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वात लढली. बाळासाहेब ठाकरे यांनी लेखणी आणि वाणीतून सत्तापरिवर्तन करुन दाखवलं, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.महाराष्ट्रामध्ये आज जो भारतीय जनता पक्ष आहे याचं श्रेय बाळासाहेब ठाकरे यांना जातं. ग्रामीण भागात भारतीय जनता पक्ष बळकट आहे तो बाळासाहेब ठाकरेंमुळेच

शिवसेना संस्थापक हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांंच्या 95 जंयतीनिमित्त राजकीय नेत्यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. अशाच प्रकारे भाजप नेते नारायण राणेंनी आदरांजली वाहताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.हिंदुत्व ज्यांचा श्वास होता आणि जन्मभर जे हिंदुत्त्वापासून तसूभरही ढळले नाहीत अशा पित्यासमान साहेबांना विनम्र आदराजली, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.