पुण्यात होणाऱ्या एल्गार परिषदेला काही अटीवर परवानगी

पुणे: भीमा कोरेगाव शौर्यदिनानिमित्ताने  1 जानेवारी रोजी एल्गार परिषद घेण्याचे ठरले होते. परंतु, राज्य सरकारने या परिषदेला परवानगी नाकारली होती. त्यानंतर एल्गार परिषदेचे आयोजक आणि माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे-पाटील (b g kolse patil) यांनी पुण्यात एल्गार परिषद घेण्यावर ठाम भूमिका मांडली होती

. त्यांनी राज्य सरकारकडे पुन्हा यासाठी रितसर परवानगी मागितली.  अखेर200 लोकांसाठी अटीशर्थींसह या परिषदेला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुले  30 जानेवारी रोजी पुण्यात एल्गार परिषदेचा मार्ग मोकळा झाला आहे 30 जानेवारीला पुण्यातील गणेश कला क्रीडा सभागृहात एल्गार परिषद घेण्यात येणार आहे.