पुणे शहर भाजपाच्या ‘ युवा वॉरिअर्स ‘ या आघाडीच्या शहर अध्यक्षपदी प्रतिक गुजराथी

IMG-20210320-WA0176

भाजपा ‘ युवा वॉरिअर्स ‘ शहर अध्यक्षपदी प्रतिक गुजराथी

पुणे :पुणे शहर भाजपाच्या ‘ युवा वॉरिअर्स ‘ या आघाडीच्या शहर अध्यक्षपदी प्रतिक गुजराथी यांची नियुक्ती झाली आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे पुणे शहर अध्यक्ष राघवेंद्र मानकर यांनी गुजराथी यांना नियुक्तीचे पत्र दिले. प्रतिक गुजराथी हे भारतीय जनता पार्टी पुणे शहर विद्यार्थी आघाडी संपर्कप्रमुख आहेत. नारायणदास फॉउंडेशनचे अध्यक्ष आहेत. पुणे शहरातील युवकांना एकत्र करुन भाजपाच्या माध्यमातून राजकीय प्रवाहात आणण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे गुजराथी यांनी सांगितले. युवकांच्या रोजगार निर्मितीसह विविध सामाजिक हिताच्या उपक्रमांना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. युवकांनी राजकारणात येण्याबाबत समाजात गैरसमज असून ते दूर करणार असल्याचे गुजराथी यांनी सांगितले. युवकांच्या समस्या मांडण्यासाठी सक्षम राजकीय व्यासपीठ उपलब्ध करुन देणार असल्याचे प्रतिक गुजराथी यांनी सांगितले.युवा वर्ग हा प्रगल्भ,कल्पक आणि संवेदनशील असतो त्यांना व्यक्त होण्याचे व्यासपीठ देणार असल्याचे आणि पक्षाने दिलेली जबाबदारी कर्तव्य निष्ठेने पार पाडणार असल्याचे त्यांनी सांगितले ………………………..

Latest News