महामानव डॉ.बाबासाहेबांना घरातूनच अभिवादन करा- पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश


पिंपरी चिंचवड | जयंती निमित्त दरवर्षी लाखो अनुयायी महामानवाला अभिवादन करण्यासाठी घराबाहेर पडतात. मात्र, यंदा देखील कोरोनाची लाट असल्याने शासनाने जयंती साजरी करण्यावर निर्बंध आणले आहेत. कोरोना संकटामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने साजरी करण्याबाबत गृह विभागाकडून निर्देश जारी करण्यात आले आहेत.महामानवाला घरातूनच अभिवादन करुन कोरोनाच्या लढ्यात प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले आहे.हामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची बुधवारी (दि. 14) 130 वी जयंती साजरी होत आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. बाबासाहेब हे अखंड भारताचे प्रेरणास्थान आहेत. त्यांची जयंती घराघरात साजरी होणे अपेक्षित आहे. मात्र, यंदा कोरोनामुळे देश वेगळ्याच संकटाशी सामना करण्यात व्यस्त आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून प्रशासनास सहकार्य करणे गरजेचे आहे.
पोलिसांकडून अनुयायांना करण्यात आलेले आवाहन –