लॉकडाऊनच्या काळात रेल्वे आणि बससेवा सुरु राहणार…


मुंबई : राज्यातील कोरोनाचा विळखा सोडवण्यासाठी राज्य सरकारकडून कडक लॉकडाऊनचे संकेत देण्यात आले आहेत. त्याबाबत काल मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. त्यानंतर आज मुख्यमंत्री कडक लॉकडाऊनची घोषणा करण्याची शक्यता आहे. संपूर्ण लॉकडाऊन म्हणजे सार्वजनिक वाहतूक आणि जिल्हाबंदी होणार का, असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. अशावेळी राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिलीय. लॉकडाऊनच्या काळातही रेल्वे, बससेवा सुरु राहील. तसंच जिल्हाबंदीही होणार नाही. पण सबळ कारणाशिवाय जिल्ह्यातून बाहेर पडता येणार नाही, असंही टोपे यांनी स्पष्ट केलंय.राज्यात संचारबंदी लागू करुनही कोरोना रुग्णसंख्येतील वाढ कमी होताना दिसत नाही. त्यामुळे राज्यात 15 दिवस कडक लॉकडाऊनची घोषणा आज होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज ही घोषणा करु शकतात. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्वच मंत्र्यांनी कडक लॉकडाऊनची मागणी लावून धरली. त्यानंतर आज मुख्यमंत्री त्याबाबत घोषणा करणार आहेत. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात रेल्वे आणि बससेवा सुरु राहणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. नाशिकमधील महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्याची धक्कादायक दुर्घटना झाली आहे. या ऑक्सिजन गळती दुर्घटनेत 11 पेक्षा जास्त रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान सद्यस्थितीत अग्निशमन दलाकडून गळती थांबवण्याचे काम सुरु आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात दुपारी 12.30 च्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाल्याचा प्रकार घडला. यानंतर ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनाची एकच गर्दी पाहायला मिळाली. या रुग्णालयात 150 लोक व्हेंटिलेटरवर होते. त्यातील 11 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर 30 जण मृत्यूच्या दाढेत असल्याचे बोललं जात आहे नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात जवळपास 131 रुग्ण ऑक्सिजनवर आहे. सध्या या रुग्णालयात अग्निशमन दल दाखल झालं आहे. या ठिकाणी ऑक्सिजन टाकीतील गळती रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. या संपूर्ण घटनेमुळे रुग्णालयात ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे.