कोरोनाची दुसरी लाट पंतप्रधान मोदी निर्मित -मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

PicsArt_04-21-09.02.00

कोलकाता | पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यादरम्यान, दावे प्रतिदावे आणि टीका प्रति टीका होत असताना पाहायला मिळत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी आपल्या प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करत देशात कोरोनाची दुसरी लाट आणि त्या लाटेचं व्यवस्थापन ही मोदी निर्मित ट्रॅजेडी आहे, असं म्हटलं आहे

.ममता बॅनर्जी यांनी केलेल्या या वक्तव्याने राजकीय वातावरणात एकच खळबळ माजली आहे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, कोरोनाची दुसरी लाट ही अत्यंत भयंकर आणि वेगवान आहे, याला मी मोदी निर्मित ट्रॅजेडी असं म्हणते. कारण, देशात इंजेक्शन उपलब्ध नाही, ऑक्सिजन उपलब्ध नाही आणि देशात कमतरता असतानाही औषध आणि लसी या बाहेर देशात पाठवल्या जात आहेत.पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रचारादरम्यान टीकेची झोड उठवली आहे.

देशामध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्याने संपूर्ण देश कोरोनाच्या दहशतीखाली जगत आहे. त्यातच ममता बॅनर्जींनी कोरोनाची दुसरी लाट ही मोदी निर्मित ट्रॅजेडी असल्याचा घणाघात केला आहे.या दरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोरोनाची लक्षणे नसल्यास नागरिकांनी घरातच राहून उपचार घ्यावेत तसेच मतदानाला येताना हलकी लक्षण असलेल्या रुग्णांनी संध्याकाळी सहानंतर मतदान करावे त्याबरोबरच डावे काँग्रेस आणि इंडियन सेक्युलर फ्रंट यांना मत दिल्याने भाजपची बाजू मजबूत होईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Latest News