ठाकरे सरकार चा महाराष्ट्रात 15 दिवसांसाठी कडक संचारबंदी…

images-2021-04-10T173840.747-2

मुंबई महाराष्ट्रातील ब्रेक द चेन अंतर्गत सरकारने राज्यातील निर्बंध अधिक कडक करून नवीन सुधारित आदेश जारी केले आहेत. नवीन आदेशानुसार नागरिक विनाकारण जिल्ह्याच्या बाहेर किंवा जिल्हा अंतर्गत प्रवास करू शकणार नाहीत. फक्त अत्यावशक काम आणि वैद्यकीय कामासाठीच नागरिकांना घराबाहेर पडता येणार आहे…….

मुंबईतील लोकलमध्ये फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना प्रवेश मिळणार आहे.| महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी राज्यात कडक निर्बंध लागू केले होते. महाराष्ट्रात 15 दिवसांसाठी कडक संचारबंदीचे आदेश देण्यात आले.

पण कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने निर्बंध अधिक कडक करण्याचा निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात आला आहे.महाराष्ट्रात नवीन नियमावली जाहीर करण्यात आली असून खासगी वाहतुकीसाठी आता फक्त वैद्यकीय किंवा इतर अत्यावश्यक कामासाठीच नागरिकांना प्रवास करता येणार आहे

गाडीच्या आसन क्षमतेच्या 50 टक्केच प्रवासी गाडीमधून प्रवास करू शकणार आहेत. याबरोबरच जिल्हाबंदीचाही निर्णय घेण्यात आला आहे.लग्नसमारंभासाठी यापूर्वी 50 लोकांना उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली होती. परंतु, सुधारित आदेशानंतर आता फक्त 25 लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा पार पाडावा लागणार

असून फक्त दोनच तास वेळ लग्नासाठी देण्यात आला आहे. नवीन आदेशानुसार लग्न कार्यक्रम आणि लग्नाचे सर्व विधी हे फक्त 2 तासांमध्ये आटोपून घ्यायचे आहेत. या नियमांचे पालन न झाल्यास 50 हजार रुपयांचा दंड राज्य सरकारकडून वसूल करण्यात येणार असल्याचंही नवीन आदेशात म्हटलं आहे.

Latest News