पुण्याचे नाशिक होऊ देऊ नये:महापौर मुरलीधर मोहोळ


पुणे |ऑक्सिजन किंवा रेमडेसिविर यांच्या पुरवठ्याची जबाबदारी ज्यांच्याकडे असेल ती त्यांनी पूर्ण क्षमतेने उभी करावी. या संबंधीची भावना आम्ही राज्य सरकारकडे केली आहे राज्य सरकारने पुण्याचे नाशिक होऊ देऊ नये असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे.
पुण्यातील कोरोना स्थितीवर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.पुणे शहरात खासगी व सरकारी हॉस्पिटल मिळून साधारण 250 मेट्रिक टन ऑक्सिजन रोज पुण्याला लागतो. मात्र गेल्या 3 ते 4 दिवसांपासून त्यात कमतरता निर्माण झाली आहे.त्यामुळे अनेक रुग्णालयातील गंभीर रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी हलवावं लागत आहे. पण आता पुरेसा साठा ऑक्सिजनचा निर्माण झाल्याशिवाय ऑक्सिजन बेड सुरू करणे शक्य नसून ही परिस्थिती भीषण आहे.
पुणे शहराताही कोरोना रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून शहरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आहेच त्यासोबतच मोठी समस्या आहे ती म्हणजे ऑक्सिजन कमी पडत आहे. त्यामुळे आता नवीन कोरोनाधितांना ऑक्सिजन मिळणं अवघड आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राज्य सरकारला आवाहन केलं
महानगरपालिकेच्या रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे 22 रुग्णांना आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना आज घडली. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी ऑक्सीजन गळतीमुळे निष्पाप लोकांचा जीव गेल्याने आक्रमक होत महानगरपालिकेच्या आयुक्तांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.