नाशिकमधील निष्पाप लोकांचा जीव गेल्याने आयुक्तांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- प्रविण दरेकर

PicsArt_04-22-12.17.33

नाशिक | विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी ऑक्सीजन गळतीमुळे निष्पाप लोकांचा जीव गेल्याने आक्रमक हो नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी ,विरोधी पक्ष नेते दरेकर मुख्य मंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली

.नाशिकमधील महानगरपालिकेच्या रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे 22 रुग्णांना आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना आज घडली. या घटनेमध्ये मृत झालेल्या रुग्णांच्या वारसदारांना राज्य सरकारतर्फे मदतही जाहीर करण्यात आली. पण विरोधी पक्षाने मात्र या घटनेवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.महाराष्ट्रात सध्या कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यातच आरोग्य यंत्रणाही अपुरी पडत असल्याने अनेकांना आपला प्राण गमवावा लागत आहे

. नाशिकमध्ये झालेल्या ऑक्सिजन गळतीमध्ये 22 रूग्णांना आपला जीव गमवावा लागला. या प्रकरणात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, “याप्रकरणात महापालिका आयुक्तांवर कारवाई झाली पाहिजे, तसेच त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल झाला पाहिजे आणि मुख्यमंत्री आणि सरकारचं नियोजनचं राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर अवलंबून असतं, त्यामुळे सरकार याला जबाबदार असून आयुक्त दोषी आहेत” अशा शब्दात प्रवीण दरेकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

“निष्काळजीपणाने अजून किती बळी घेणार आहात? नाशिकच्या रुग्णालयात झालेली ऑक्सीजन टँकर गळती दुर्देवी असून याबाबत आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर त्वरित कारवाई करून अशा घटना पुन्हा घडू नयेत याची काळजी घेण्यासही सांगितले” अशा आशयाचं ट्विट करून प्रवीण दरेकर यांनी या बद्दलची माहिती दिली. त्याबरोबरच छात्रभारती या विद्यार्थी संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आयुक्तांना तातडीनं हटवण्याची मागणी केली आहे.

Latest News