कॉलेज मध्येच विध्यार्थ्यांना लस द्या:-नगरसेविका रुपाली धाडवे


पुुणे: पुणे शहरात या योजनेची अंमलबजावणी काटेकोरपणे होण्याकरता व पुण्यामध्ये १०० टक्के लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य होण्याकरता पुढील काळात १८ वर्षावरील नागरिकांची संख्या पाहता मोठ्या प्रमाणावर लसीकरण केंद्राची आवश्यकता भासणार आहे. यामध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे पुणे शहरातील नागरिकांच्या सोयीकरता व लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी टाळण्याकरता जे विद्यार्थी महाविद्यालयात सद्यस्थितीत शिक्षण घेत आहेत त्यांना त्यांच्या महाविद्यालयातच पुणे महानगरपालीके मार्फत लस उपलब्ध करून लसीकरण करण्यात यावे
.१ मे पासून १८ वर्षावरील नागरिकांना कोरोनाची लस देण्यास केंद्र सरकारने अनुमती दिलेली आहे.त्यामुळे लसीकरणासाठी सध्याच्या केंद्रावर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे त्यासाठी कॉलेजमधील सर्व विद्यार्थांना त्यांच्या कॉलेजमध्येच लस देण्याची मागणी नगरसेविका व महिला बाल कल्याण समीती अध्यक्षा रुपाली धाडवे यांनी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे केली आहे.
त्यामुळे लसीकरण केंद्रावर होणाऱ्या गर्दीस प्रतिबंध बसेल त्याचबरोबर पुणे शहरातील अठरा वर्षांवरील इतर नागरिकांसाठी सध्या बंद अवस्थेत असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करून लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात यावी अशी मागणी रुपाली धाडवे यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, आरोग्य अधिकारी डॉक्टर आशिष भारती, महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते गणेश बिडकर यांना केली आहे. या नियोजनामुळे लसीकरण वेगात व वीना गर्दी पार पडेल.व पुणेशहरातील कोरोना प्रभाव वेगाने थांबवण्यास देखील मदत होईल असे धावडे यांनी पत्रकाराशी बोलतांना संगीतले.