24 एप्रिल पासून 18 वर्षे पूर्ण लसीकरनासाठी नोंदणी

images-2021-04-08T104159.660-2

नवी दिल्ली | 1 मे 2021 पासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात होणार आहे. यामध्ये आता 18 वर्षांवरील सर्व लोकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. या लसीकरणासाठी अनेक लोक नोंदणी करण्यासाठी पर्याय शोधत आहेत. पण अजून ही नोंदणी सुरू करण्यात आली नाही. पण नोंदणीची तारीख सरकारतर्फे जाहीर करण्यात आली आहे.

24 एप्रिल 2021 पासून तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाची नोंदणी सुरू होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. कोविन ॲप आणि cowin.gov.in यावर जाऊन 18 वर्षांपुढच्या सर्व नागरिकांना लसीकरणासाठी नोंदणी करून लसीकरणात सहभागी होता येणार आहे.देशभरात कोरोना लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला ज्येष्ठ नागरिकांना हि लस उपलब्ध करून देण्यात आली

. तसेच त्यानंतर 45 वर्षांवरील सरसकट सर्वांनाच कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात नुकतीच एक बैठक पार पडली आणि त्यामध्ये राज्यातील 18 वर्षांपुढच्या नागरिकांचं लसीकरण मोठ्या प्रमाणात कसं करता येईल, यावर चर्चा करण्यात आली आहे. महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक लसीकरण करण्यात आलं आहे. तसेच येणाऱ्या काळात जवळपास 8.5 कोटी नागरिकांचं लसीकरण करण्याचं लक्ष्य असल्याचं महाराष्ट्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्याचबरोबर ब्रिटनप्रमाणे महाराष्ट्रातही सर्वच खात्यांचा फंड हा कोरोना लसीकरणासाठी वापरण्यात येणार आहे.

Latest News