पश्चिम बंगाल सरकार मोफत लस देणार- मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

नवी दिल्ली | पश्चिम बंगाल सरकार मोफत लस देणार आहे.ज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला आता दक्षिण दिनाजपूर भागातल्या एका सभेत बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे. 5 मेपासून राज्यात जे कोणी पात्र असतील त्या सर्वांना लस पूर्णपणे मोफत दिली जाणार असल्याचं ममता यांनी सांगितलं आहे. याआधी लसींच्या नव्या किमतीवरून ममता यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता.भाजप कायम एक देश, एक पक्ष, एक नेता असं ओरडत असतं. पण लोकांचे प्राण वाचवण्यासाठी ते लसीची एक किंमत मात्र ठरवू शकत नाहीत. प्रत्येक भारतीयाला मोफत लस मिळायला हवी. यासाठी त्यांचं वय, जात, पंथ, स्थळ अशा कोणत्याही मर्यादा नकोत. खर्च केंद्र करो किंवा राज्य, पण भारत सरकारने देशभरात करोना प्रतिबंधक लसीची एकच किंमत ठरवून द्यायला हवी, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं होतं.देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हैदोस घातला आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 18 वर्षावरील सर्वांना लस घेता येणार असल्याचं सांगितलं आहे. अशातच बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लसीबाबत मोठी घोषणा केली आहे.

दरम्यान,सीरम या लस उत्पादक कंपनीने कालच त्यांच्या कोविशिल्ड या लसीच्या नव्या किमती जाहीर केल्या. यानुसार, राज्य सरकारांना ही लस 400 रुपयांना मिळणार असून खाजगी दवाखान्यांना हीच लस 600 रुपयांना मिळणार आहे.