लातूरात लवकरच सर्वसोयीनियुक्त जम्बो कोवीडसेंटर चालू होणार: अमित विलासराव देशमुख

*लातूरात लवकरच सर्वसोयीनियुक्त जम्बो कोवीड केअर* *सेंटर**ऑक्सिजन व औषधांचा नियमीत पुरवठा होईल**डॉक्टर्स, रूग्णाच्या नातेवाईकांनी निश्चीत रहावे* *पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख*
लातूर प्रतिनिधी दि.22 संतोष टाक सर्व रूग्णालयांनी तातडीने इलेक्ट्रीकल ऑडीट करून घ्यावे शासकीय आणि खाजगी रूग्णालयाची व्हेन्टिंलेटरची संख्या वाढवावी हेल्पलाईनचे काम अधिक प्रभावीपणे करावे ऑक्सिजनचा वापर काटकसरीने करावा रेमेडीसीवीर इंजेक्शनचा पूरवठा वाढला आहे वापरा बाबत आचारसंहिता पाळावी खाजगी रूग्णालयांना हॉटेलची सलग्नता करावी कोवीड केअर रूग्णालया बाहेरच्या गर्दीवर नियंत्रण आणावे खाजगी रूग्णालयांनी ऑक्सिजन निर्मीती प्लांट उभारावेत रूग्णांची माहिती भरण्यासाठी एक खिडकी योजना अधिक सुलभ राबवावी वैदयकीय महाविदयालयात पोस्ट कोवीड ओपीडी सुरू करावीत सर्वांच्या सहभागातुन लसीकरणाला गती दयावी कोवीड केअर रूग्णालयात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्याना वीमा संरक्षण देणे बाबत पाठपूरावा वाढती रूग्णसंख्या लक्षात घेऊन लातूरात लवकरच जम्बो कोवीड केअर सेंटर उभारण्यात येईल. लातूर जिल्हयातील ऑक्सिजनचा पूरवठा आता सुरळीत झाला आहे. आगामी काळातही तो नियमीत होत राहील चिता करून नये, रेमेडीसीवीर इंजेक्शन पूरवठा वाढवीला आहे. आणखी वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. इतर औषधे व व्यवस्थाचेही नियोजन करण्यात आले आहे, असे सागून डॉक्टर मंडळीनी रूग्णांची चांगली काळजी घेऊन जनतेला दिलासा दयावा असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे. पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी गुरूवार दि. २२ एप्रिल रोजी दुपारी लातूर जिल्हयातील सर्व वरीष्ठ अधिकारी, आयएमएचे पदाधिकारी, शासकीय तसेच खाजगी कोवीड१९ डेलीकेटेड रूग्णालयातील प्रमुख डॉक्टर्स यांच्याशी झुम व्हिसीव्दारे संवाद साधून कोरोना बाधित रूग्णावरील उपचार आणि हा प्रादूर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपयायोजनांचा आढावा घेतला या प्रसंगी ते बोलत होते. बैठकीच्या प्रारंभी रूग्णांची वाढती संख्या, ऑक्सिजन, रेमेडीसीवीर इंजेक्शन तुटवडा प्रसारमाध्यमे तसेच समाजमाध्यमातून येणाऱ्या बातम्या, ग्रामिण भागात ठिकठीकाणी उभारण्यात आलेले कोवीड सेंटर बेडची उपलब्धता, मनुष्यबळाची टंचाई, मनुष्यबळ निवासाची व्यवस्था, आरोग्य कर्मचाऱ्यांना वीमा संरक्षण आदी बाबीवर विस्तृत चर्चा झाली. त्यांनतर बोलतांना पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख म्हणाले की, ग्रामीण भागात व्यवस्था उभारत असतांना लातूर शहरामधील वाढती रूग्णसंख्या लक्षात घेऊन शहरातही एक जम्बो हॉस्पिटल उभारण्याचे नियोजन सुरू आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या बेडची संख्या वाढणार आहे. संपूर्ण देशातच ऑक्सिजन आणि रेमेडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभुमिवर लातूर शहरासाठी या गोष्टींचा पूरवठा नियमीत होईल याची दक्षता घेतली आहे. डॉक्टर मंडळीनीही आजारसंहितेचे पालन करून ऑक्सिजन आणि औषधांचा वापर करावा. ऑक्सिजन निर्मीतीसाठी खाजगी डॉक्टरांनी पूढाकार घ्यावा, त्यांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला जाईल. वेन्टिंलेटरही आवश्यकते प्रमाणे पूरवला जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. सर्व रूग्णालयांनी तातडीने इलेक्ट्रीकल ऑडीट करून घ्यावे, शासकीय आणि खाजगी रूग्णालयाची व्हेन्टिंलेटरची संख्या वाढवावी, हेल्पलाईनचे काम अधिक प्रभावीपणे करावे, ऑक्सिजनचा वापर काटकसरीने करावा, रेमेडीसीवीर इंजेक्शनचा पूरवठा वाढला आहे वापरा बाबत आचारसंहिता पाळावी.