प्रधानमंत्री आवास योजनेच्या अनुषंगाने स्वीकारलेले अनामत रक्कम परत करा :गुलाब पान पाटिल

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेच्या अनुषंगाने स्वीकारलेले अनामत रक्कम ५०००/-  अपात्र लाभार्थ्यांना परत करा :गुलाब पान पाटिल
पिंपरी (प्रतिनिधी ) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने सन 2020 मध्ये  पिंपरी-चिंचवड शहरात प्रधानमंत्री आवास योजना अनामत रक्कम रुपये ५०००/-. रक्कम ही अपात्र तात्काळ परत करा अशा आशयचे निवेदन वंचित बहुजन आघाडी चे अध्यक्ष गुलाब पानपाटील यांनी आयुक्ताना दिले आहे
अपात्र ठरलेल्या नागरिकांना त्यांचे अनामत रक्कम रुपये पाच हजार देण्यात आलेले नाही. सध्या शहरांमध्ये covid-19 या विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने पालिका प्रशासनाकडून जिल्हा प्रशासनाकडून राज्य प्रशासनाकडून कडक निर्बंध लादून लॉकडाऊन जाहीर केलेला आहे.
त्यामुळे सर्वसामान्य माणसांपासून ते व्यापारी उद्योजकांपर्यंत आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे. सदर योजना ही मुळातच आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या व बेघर असणाऱ्या नागरिकांसाठी होती.  यातील बरेचसे नागरिक हे झोपडपट्टीतील मजूर असून त्यांचे लॉकडाऊनमुळे रोजगार गेल्याने उपासमारीची वेळ आलेली आहे.
कोणतेच शासन व प्रशासन या नागरिकांना कोणतेही आर्थिक मदत करत नसल्याने त्यांना हातभार म्हणून या योजनांमध्ये केलेली हक्काची अनामत  रक्कम परत मिळणे न्यायाच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील अपात्र नागरिकांनी भरलेली अनामत रक्कम त्यांना त्वरित देण्यात यावी.
अपात्र नागरिकांनी सदरची रक्कम न मिळाल्याने आत्महत्या केल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहीलअशा आश्याचे निवेदन वंचित बहुजन आघाडी चे अध्यक्ष गुलाब पानपाटील यांनी आयुक्ताना दिले आहे