सोशल मीडिया मैत्रीमुळे पुण्यातील महिलेची कोटींचं नुकसान

पुणे | सायबर सेलचे इन्स्पेक्टर अंकुश चिंतामण यांनी सांगितलं की, 2020 मध्ये महिलेला ब्रिटनमधील फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली. पुढील 5 महिन्यांत त्या व्यक्तीने त्या महिलेला विश्वासात घेतलं. एक दिवस त्या माणसाने त्या महिलेला सांगितलं की त्याने तिला वाढदिवसाची भेट म्हणून आयफोन पाठविला आहे.सप्टेंबर महिन्यात या व्यक्तीनं दिल्ली विमानतळावर गिफ्टवर असलेले सीमा शुल्क क्लियर करण्याच्या बहाण्यानं महिलेकडे मोठ्या रकमेची मागणी केली. या व्यक्तीनं महिलेला कूरिअर एजन्सी आणि कस्टम अधिकारी बनून स्वतःच फोन केला की ब्रिटनहून आलेल्या पार्सलमध्ये ज्वेलरी आणि विदेशी करंसी असल्यानं महिलेला अधिक शुल्क भरावा लागेल.सोशल माध्यम जितकी चांगली आहेत पण आपण जर काळजी नाही घेतली तर त्याचा फटकाही आपल्याला बसू शकतो. सध्या ऑनलाईन झालेल्या मैत्रीमुळे अनेक फसवणुकीचे प्रकार झाल्याचं समोर आलं आहेत. अशाच प्रकारे पुण्यातील 60 एका वर्षीय महिलेला अशा मैत्रीमुळे कोटींचं नुकसान झालं आहे.दरम्यान,  संबंधित महिला पुणे शहरातील एका खासगी कंपनीत वरिष्ठ कार्यकारी पदावर कार्यरत आहे. काही महिन्यांतच महिलेच्या खात्यातून 27 वेगवेगळ्या खात्यांमधून 207 व्यवहार झाले ज्यात महिलेचे 3.98 कोटी रुपये उडवण्यात आले.  सप्टेंबर 2020 पासून आतापर्यंत महिलेची 3,98,75,500 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. नुकतंच सायबर सेलसोबत संपर्क केल्यानंतर या महिलेच्या लक्षात आलं, की आपल्यासोबत मोठी फसवणूक झाली आहे. सायबर पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल करुन घेतली आहे.