सरकारने खर तर मोफत लस देणं गरजेचं -प्रकाश आंबेडकर


पुणे | लसीबाबत भारताने लवकर निर्णय घ्यावा. लसीचे उत्पादन आपल्याकडे होत आहे. तरी लस आपल्याकडे महाग कशी?, सगळ्यांना 150 रुपयात लस द्या?, 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येणार आहे. पण त्यासाठी जाहीर केलेले दर हे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर आहेत. सरकारने खर तर मोफत लस देणं गरजेचं आहे. त्या दराबाबतलसींच्या दराबाबत पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गप्प का आहेत, असा, सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.पंतप्रधान निधीमध्ये किती निधी आला याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली नाही. माझ्या माहिती प्रमाणे हजार कोटींपेक्षा अधिक पैसे आले. काल पंतप्रधान मोदी यांनी या निधीचा वापर करू. असं सांगितल्यावर भाजपवाले त्यांची पाठ थोपटत आहेत. पंतप्रधानांच प्राधान्य बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना हरवणं होतं, असं म्हणत आंबेडकरांनी मोदींवर निशाणा साधला.कोरोनाच्या दुसऱ्या महामारीमुळे देशात सध्या हैदोस घातला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सरकारने लसीकरणावर भर द्यायला सुरूवात केली आहे. 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येणार आहे. पण या लसीचे दर जे ठरवण्यात आले आहेत त्यावरून टीका होत आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सवाल केला आहे. पुण्यात ते पत्रकार परिषदेत ते बोलत होते.रम्यान, बंगालमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मोदी यांनी मिळून 294 सभा घेतल्या होत्या. कोविड वाढताना मोदी निरो सारखं वागत होते. रोम जळताना निरो व्हायोलिन वाजवत होता तसं यांचं लक्ष बंगालवर होतं. आम्ही अपेक्षा करतोय तृणमुल काँग्रेसने तिथे पून्हा सरकार स्थापन करावं, असं आंबेडकर म्हणाले.