आमचा पंतप्रधान नरेंद्र मोदीवर पूर्ण विश्वास आहे – संजय राऊत


पंतप्रधान नरेंद्र मोदींवर होत असलेल्या टीकेवरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोदींची पाठराखण केली आहे. ऐरवी भाजपवर आणि केंद्रावर टीका करणाऱ्या राऊतांनी लक्षवेधी वक्तव्य केलं आहे.पंतप्रधान आणि देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये आता समन्वय असून ते येत्या काळात योग्य तोच निर्णय घेतील. आमचा पंतप्रधानांवर पूर्ण विश्वास आहे अशी ठाम भूमिका संजय राऊतांनी मांडली. मंगळवारी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.रम्यान, देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता मद्रास उच्च न्यायालयानं अतिशय गंभीर टीप्पणी केली. ज्यामुळं देशातील विविध राज्यांमध्ये सुरु असणाऱ्या निवडणूक प्रक्रियेला निशाणा केलं गेलं. या टीप्पणीचा पंतप्रधान गांभीर्यानं विचारही करतील असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.भारतात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांची आकडेवारी वाढत आहे तर यामध्ये अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. एकीकडे कोरोना वाढत असताना बेड आणि ऑक्सिजनची समस्या उद्भवली आहे. देशातील या गंभीर परिस्थितीवरून भारतातील सत्ताधाऱ्यांना कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयश आलं. यावरून जागतिक माध्यमांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.