छोट्या-छोट्या कोव्हिड सेंटरलाही रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळालीच पाहिजेत- वसंत मोरे

पुणे ::“हे लोकं चुका करणार… आज या डॉक्टरांकडची परिस्थिती ऐका… रेमडेसिव्हीर इंजेक्शन नाही म्हणून रोज आठ ते दहा पेशंट शिफ्ट करावे लागत आहेत. बाहेरच्यांना बेड मिळत नाहीत. आम्ही बोलायला गेलो की अधिकारी टेबलवरुन उठून जातात. आम्ही आमच्या घरच्यांसाठी मागतोय काय? कुठवर जीआर दाखवणार? आमची लोकं मरायला लागलीत तरी? एक नगरसेवक काम करतोय, तर त्याला सपोर्ट करायचा सोडून तुम्ही त्याला बाहेर खेचता” अशा शब्दात वसंत मोरे यांनी संताप व्यक्त केला.
रेमडेसिव्हीर इंजेक्शनवरुन राडा केला. छोट्या-छोट्या कोव्हिड सेंटरलाही रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळालीच पाहिजेत, अशी मागणी मोरेंनी केली. या घटनेचं लाईव्ह वसंत मोरे यांनी स्वतःच्या फेसबुक अकाऊण्टवरुन केलं. ‘परवानगीविना फोटो कसे घेता?’ असा प्रश्न विचारणाऱ्या महिला अधिकाऱ्यालाच मोरेंनी झापलं
“सौम्य लक्षणं म्हणताय.. तुम्ही आला होतात का मॅडम आमच्याकडे बघायला?” असं वसंत मोरे म्हणताच तिथल्या महिला अधिकाऱ्याने स्थायी समितीकडे दिल्याचं सांगितलं. कॅमेराकडे बोट दाखवून महिलेने बंद करण्याची सूचना केली. त्यावर वसंत मोरेंनी भडकून “नाही बंद करणार, माझा हक्क आहे तो” असं उत्तर दिलं. “एका स्त्रीचे फोटो घेण्याआधी तुम्ही परवानगी घेतलीत का?” असा प्रतिप्रश्न महिला अधिकाऱ्याने केला असता आपण फेसबुक लाईव्ह करत असल्याचं मोरेंनी सांगितलं.
वसंत मोरेंची कोरोनाग्रस्तांना मदत
याआधीही वसंत मोरे यांनी कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात दिल्याचं त्यांच्या ट्विटर अकाऊण्टवर दिसतं. 27 वर्षांची तरुणी सिद्धी परदेशी अनेक दिवसांपासून अनेक आजारांनी ग्रस्त. त्यात भरीला भर कोरोनाने गाठलं. तिला पुण्यात बेड मिळाला नाही. तेव्हा मनसे कार्यकर्त्यांनी तिला चाकणला बेड मिळवून दिला. या पोरांसारखे नगरसेवक जर पुणेकरांनी माझ्या साथीला 2022 ला निवडून दिले तर कोरोनासारख्या अडचणीलाही सहज हरवेन, असा विश्वास वसंत मोरे यांनी व्यक्त केला आहे.