Crime: पुण्यात अतिशय क्रूरपणे महिलेचा हत्या


पुणे |…पुणे हे गुन्हेगारीच्या शहरांमधील टाॅपचं नाव आहे. अनेकदा या ठिकाणी दिवसाढवळ्या देखील गोळ्या झाडल्याचे आवाज येतात, तर कधी कोणाचा मृतदेह आढळतो. अशातच पुण्यात एका महिलेचा मृतदेह आढळल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर संबंधित परिसरात एकच खळबळ माजली. एवढंच नाही तर महिलेची ओळख न पटण्यासाठी आरोपीने अतिशय क्रूरपणे तिचा चेहरा विद्रुप केला.
लोहगाव येथील कुबेर पार्क समोरील डी. वाय पाटील काॅलेज समोर एका महिलेचा मृतदेह पडला होता. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलेची ओळख न पटण्यासाठी आरोपीने अत्यंत क्रूरपणे तिचा चेहरा दगडाने ठेचला होता. संबंधित मृत महिलेचं वय 35 वर्ष आहे.महिलेच्या अंगावर मोरपंखी रंगाचा गाऊन आहे. तसेच तिच्या डाव्या हाताच्या अंगठ्याजवळ S A असं इंग्रजीमध्ये लिहलेलं आहे. महिलेचा मृतदेह मिळून एक दिवस झाला आहे तरी अद्याप तिची ओळख समोर आलेली आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत. तसेच या प्रकरणातील आरोपीची देखील अजून कोणतीही माहिती मिळाली नसून त्याचा देखील शोध सुरु आहे. एवढंच नाही तर महिलेची ओळख समोर आणण्यासाठी पोलीस अनेक प्रयत्न करत आहेत.