पुण्यात अल्पवयीन तरुणी गर्भवती धक्कादायक घटना उघड


पुणे.. (प्रतिनिधी )पुण्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ 17 वर्षांची असलेली तरुणी गर्भवती असल्याचं समोर आलं. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे.रम्यान, संपुर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित तरुणीने विमानतळ पोलिस ठाण्यात जाऊन आरोपी तरुणाविरोधात तक्रार नोंदवली आहे. मात्र संबंधित आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
लोहगाव येथील एका महाविद्दालयात संबंधित तरुणी शिक्षण घेत होती. रोज महाविद्दालयात जाताना एका तरुणाने तिची ओळख काढली. या ओळखीचं रुपांतर काही वेळानंतर चांगल्या मैत्रीत झालं. संबंधित तरुणीला विश्वासात घेत आपलं घर दाखवण्याचं कारण सांगून तरुणाने तिला लोहगाव येथील खंडोबा माळ डोंगरावर नेलं. तिथं नेल्यानंतर लग्नाचे खोटं आमिष दाखवून तरूणाने तिच्या इच्छेविरुद्ध शरीरिक संबंध ठेवले
.हा प्रकार ताजा असतानाच संबंधित तरुणीला आठ दिवसानंतर आरोपी तरुणाने पुन्हा एकदा त्याच ठिकाणी नेलं. तिथं नेल्यानंतर त्याने परत एकदा शारीरिक संबंध ठेवले. काही दिवसांनंतर तरुणी गर्भवती राहिली. त्यानंतर तरुणीने आपल्यावर बलात्कार झाला असल्याचं सांगितलं.