पुण्यासाठी केवळ 5 हजार लशींचा पुरवठा


पुणे | सध्याचा लसीचा पुरवठा आणि नागरिकांची संख्या लक्षात घेता. आपल्याला प्रचंड लस तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे सरकारने अधिकाधिक लसीचा पुरवठा केला पाहिजे. तसेच ज्या नागरिकांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि लस घेण्याची तारीख असेल. त्याच नागरिकांनी केंद्रावर जावे, रजिस्ट्रेशन झाले म्हणून केंद्रावर जाऊ नये, असेही त्यांनी आवाहन त्यांनी केले. 18 ते 44 या वयोगटाकरिता ५ हजार लस आहेत.
आपल्याला पुढील आठवड्याभरासाठी असणार आहे
. त्यामुळे अशी समस्या निर्माण झाली आहेयावेळी मुरलीधर मोहोळ म्हणाले की, राज्यभरात आज १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरू आहे. आपल्या शहरात देखील लसीकरण करण्यात येत आहे. पुण्यासाठी केवळ पाच हजार लशींचा पुरवठा १८ ते ४४ वयोगटासाठी करण्यात आला आहे. हे लसीकरण पुढील आठवड्याभर कमला नेहरू रुग्णालय आणि राजीव गांधी रुग्णालय या दोन ठिकाणी केले जाणार आहे.
त्यामुळे दररोज साधारण दोन्ही केंद्रावर प्रत्येकी ३५० व्यक्तींना लस दिली जाणार आहे.आज १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी कमला नेहरू आणि राजीव गांधी रुग्णालयात लसीकरण सुरू आहे. या दोन्ही केंद्रावर नागरिकाची प्रचंड गर्दी पाहण्यास मिळत आहे. यामुळे लसीकरणावेळी गोंधळ देखील उडाल्याचे दिसून आले. याबद्दल महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की, शहरात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांची संख्या १५ लाखांहून अधिक आहे. त्या तुलनेत आज पहिल्याच दिवशी दोन्ही केंद्र मिळून, ७०० नागरिकांना लस देण्याचे काम सुरू आहे.