कामगार दिनानिमित्त जनस्वराज्य सेनेच्या वतीने पोलीस,आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना मोफत मास्क चे वाटप.


महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनानिमित्त जनस्वराज्य सेनेच्या वतीने पोलीस प्रशासन व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना मोफत मास्क चे वाटप
दि.1 (लातूर प्रतिनिधी संतोष टाक). आज दिनांक 1 महाराष्ट्र दिन व कामगार दिन तसेच जनस्वराज्य सेनेचे महाराष्ट्र राज्य संघटक विनोद भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आज लातूर ते नांदेड महामार्गावर त्याच बरोबर घरणी येथील पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांना तेथील पोलिस प्रशासनाला व जानवळ येथील आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना ऑन ड्युटी वर असलेली पोलीस पदाधिकारी यांना जनस्वराज्य सेनेचे महाराष्ट्र राज्य संघटक विनोद भाऊ जाधव तसेच संघटनेतील इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मोफत मास्क चे वाटप करण्यात आले
अनेकांच्या तोंडाला मास्क नसल्यामुळे कोरोना महामारी मुळे होत असलेला मृत्यूदर त्याचबरोबर कोरोनो विषयी जनजागृती करून याबाबत त्यांना मास्क चे महत्त्व पटवून देण्यात आले यावेळी उपस्थित घरणी चे पोस्टमास्टर जानवळ येथील आरोग्य कर्मचारी पोलीस थोरमोठे साहेब शासकीय सेवेत असलेले आणि कर्मचारी व नागरिक उपस्थित होते