पुणे जिल्ह्यातील ४६३ रुग्णालयांना रेमडेसिव्हिरचे वितरण

remdesivir

पुणे…करोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी जिल्हा प्रशासनाकडून रविवारी चार हजार २०० रेमडेसिव्हिर इंजेक्शनचे वितरण करण्यात आले. रुग्णांना त्रास झाल्याने तूर्त थांबविण्यात आलेला हैदराबाद येथील एका कंपनीच्या इंजेक्शनचा पुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला आहे. हैदराबाद येथील एका कंपनीच्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनमुळे रुग्णांना त्रास झाल्याचा प्रकार गेल्या आठवड्यात घडला होता कंपनीकडून इंजेक्शन घेणे थांबविण्यात आले होते. मात्र, आता पुन्हा त्या कंपनीकडून पुरवठा सुरू करण्यात आला आहे. रविवारी मिळालेल्या चार हजार २०० पैकी चार हजार १८० इंजेक्शन संबंधित कंपनीचे असून, शहर आणि जिल्ह्यातील ४६३ रुग्णालयांना या इंजेक्शनचे वितरण करण्यात आले असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

. करोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी जिल्हा प्रशासनाकडून रविवारी चार हजार २०० इंजेक्शनचे वितरण करण्यात आले. रुग्णांना त्रास झाल्याने तूर्त थांबविण्यात आलेला हैदराबाद येथील एका कंपनीच्या इंजेक्शनचा पुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला आहे.त्या कंपनीकडून दोन हजार ३६६ इंजेक्शन उपलब्ध झाली होती.

Latest News