चंद्रकांत पाटिल यांना कोल्हापूर सोडून पुण्यातील मतदारसंघ निवडावा लागला:रुपाली चाकणकर

पुणे :: चंद्रकांत पाटील यांना स्वत:च्या गावात ग्रामपंचायत निवडून आणता आली नाही. कोल्हापुरात त्यांना महापौर बसवता आला नाही. या दैदिप्यमान कामगिरीमुळेच तुम्हाला कोल्हापूर सोडून पुण्यातील एका महिलेचा सुरक्षित मतदारसंघ निवडावा लागला, असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.
चंद्रकांत पाटील यांना कोरोनाच्या संकटाशी काहीही देणघेणं नाही. ‘याला महागात पडेल’, ‘त्याला बघून घेऊ’, ‘त्याच्यावर गुन्हा दाखल करा’, ‘त्याला आत टाका’, अशा विषयांवर पीएचडी पूर्ण करुन चंद्रकांतदादा एम फिल करत आहेत, असंही रुपाली चाकणकर म्हणाल्या.दरम्यान, चंद्रकांतदादांनी आपल्या आजुबाजूला पाहिले तर भाजपामधील अनेक नेतेही जामिनावरच बाहेर आहेत, हे त्यांच्या लक्षात येईल.
चंद्रकांत पाटलांनी इतरांशी मग्रूरपणे बोलू नये, नाहीतर तुमच्याशिवाय तुमच्या आजूबाजूला असलेल्या इतरांची बोलती बंद होईल, असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. मंगळवेढा- पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपच्या समाधान अवताडे यांनी राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांचा पराभव केला. यावरूवन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला टोला गमावला आहे. पाटलांच्या या टीकेला राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.