सीरमनें महाराष्ट्राला झुकते मापं द्यावे :आरोग्यमंत्री राजेश टोपे


मुंबई |केंद्र सरकारने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 18 वर्षावरील सर्वांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय घेतला. 1 मेपासून लसीकरणाता टप्पा चालू करणार होते मात्र लसी उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण सध्या बंद आहे. लवकरात लवकर लसीकरण चालू व्हावं यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपली सीरम इन्स्टिट्यूटला एक विनंती केली सीरम इन्स्टिट्यूट ही महराष्ट्रात पुण्यात आहे त्यामुळे अदर पूनावाला यांनी लस देण्याच्याबाबतीत महाराष्ट्राला काहीसं झुकतं माप द्यावं, अशी विनंती राजेश टोपे यांनी केली आहे.
कुठल्याही पद्धतीने आम्हाला लसीकरण 18 ते 44 असेल, यासाठी लागणारी किंमत ही राज्य सरकार लगेच द्यायला तयार आहे. परंतु आपल्याला अधिक जास्त झुकतं माप मे आणि जून महिन्यात असलायला हवं. जेणेकरून आपल्याला अधिक गतीनं लसीकरण करता येईल, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
, लस उपलब्ध नसल्याने, आपल्या जवळ निधी आहे आपण खर्च करायला तयार आहोत, विकत घ्यायला तयार आहोत पण उपलब्ध नसल्याने आज आपल्याला 18 ते 44 वयोगाटातील लसीकरण ते कमी गतीनं करावं लागत असल्याचं टोपे म्हणाले.